Thursday, September 18, 2008

हसा हसा हसा हसा !!!!!!!!!!!!!!!!!

एका झाडावर पाच पक्षी बसलेले असतात.
तिथे एक शिकारी येतो आणि गोळी झाडतो.
एका पक्ष्याला गोळी लागते. तो खाली कोसळतो.
गोळीबाराने घाबरून तीन पक्षी उडून जातात.
एक पक्षी मात्र झाडावर तसाच बसून राहतो... ...

का?
...
...
का?
...
...
का?
...
...
का?
...
...
का?
...
...











































... अंगात मस्ती, दुसरं काय?

Sunday, September 7, 2008

पिम्पल्पान


आठवणींचा लेवुन शेला
नटून बसले माय मराठी
दिवस झेलतो सुसाट वारा
तरीही दिल्या जीवंत वाती
जगण्या मधल्या अर्थासंगे
वाकून केले अक्षर रान
वार्यावरती फीरकत आले
आठवणींचे पिम्पल्पान
पिम्पल्पान पिम्पल्पान

Saturday, September 6, 2008

मेघ दाटले


मेघ दाटले मेघ दाटले
जरी पावसाला जुना शब्द आहे
तरी काच-पाणी नवे-नित्य वाहे
जुन्या आठवाने नवे होत जाते
तुझे आणी माझे असे एक नाते असे एक नाते
तुला पहाताना पुन्हा दाटले
जुने मेघ काले पहा दाटले
मेघ दाटले मेघ दाटले
मेघ दाटले मेघ दाटले

फक्त एकदा हो म्हन,....

तुझ्यासोबत सात पावल चालायचय,
अन त्या पावलातल अंतर मनात ठेवायाचय,

फक्त एकदा हो म्हन,
तुझा हात माझ्या हाती घ्यायचाय ,
अन त्यातला ओलावा मनात जपायचाय,

फक्त एकदा हो म्हन,
तुझ्या डोळ्यांत डोळे घालून बघायचय,
अन त्यातल प्रेम अनुभावयाचय ,

फक्त एकदा हो म्हन,
तुझ्या ओठाना मला स्पर्ष करायचाय,
अन त्यातल्या नि : शब्द भावना जाणून घ्यायाच्याय ,

फक्त एकदा हो म्हन,
तुझ्या कमरेत हात घालून तुला जवळ घ्यायचय,
अन तुझ्या - माझ्यातला दुरावा सम्पवयाचय,

फक्त एकदा हो म्हन,
सप्त रंगताले सातही रंग तुला द्यायाचेत,
अन त्यातला आनंद मला जपून ठेवायाचय,
फक्त एकदा हो म्हन,




तुझ्या मनात होणार्या भावनांचा शोध घ्यायचाय ,
अन त्याना माझ्या मनाशी जोडायाचय,फक्त एकदा हो म्हन,
तुझ्या साथीत सात जन्म रहायचय,
अन गोड संसाराच सुख उपभोगयाचय ,

म्हणुन तर ...फक्त एकदा हो म्हन....

Friday, September 5, 2008

मुका-

वात्सल्यमय मुका...
कपाळावर

गोड मुका...
गालांवर

प्रेमळ मुका...
मानेवर

अतिप्रेमळ मुका...
ओठांवर

...

आणि 'हॉट किस'...
.
.
.

गरम इस्त्रीवर!!!!!

( शंका असेल तर ट्राय करून पाहा.)

पुल्लिंगी -

१. टायर - पुल्लिंगी.
लवकर 'गोटा' होतो आणि कधी कधी प्रमाणापेक्षा जास्त फुगतो.

२. गरम हवेचा फुगा - शंभर टक्के पुरुषी.
त्याला कोठूनही कोठेही पाठवायचा असेल, तर खाली आग पेटवावी लागते. शिवाय 'हवा भरणे'ही आहेच.

एकच बेड-

मेडिकल रिप्रेझेंटिटिव्ह विन्या प्रधान एके रात्री आडगावातल्या एकमेव लॉजच्या रिसेप्शन काऊंटरवर उभा होता. शेवटची एसटी चुकली होती आणि रात्र या बकाल लॉजवर काढण्याला पर्याय नव्हता. त्यात समोरचा कारकून सांगत होता, ''साहेब, एकच बेड शिल्लक आहे पण तो आमच्या घाशीराम घोरणेच्या रूममधला. त्याच्या सातमजली घोरण्यामुळे त्या मजल्यावरचे सगळे कस्टमर कम्प्लेंट करतात. त्याच्या खोलीत तुमची व्यवस्था केली, तर तुमची काय अवस्था होईल?''
'' माझी चिंता करू नका. मस्त आरामात झोपेन मी,'' शिट्टी वाजवत विन्या उत्तरला आणि रूमकडे निघालासुद्धा...
... दुसऱ्या दिवशी सकाळी एकदम गाढ झोपून फ्रेश झालेला विन्या चहा प्यायला खाली उतरला, तेव्हा चकित होऊन रिसेप्शन क्लर्कने विचारलं, ''साहेब, झोप लागली तुम्हाला? कशी?''
'' एकदम गाढ झोपलो मी,'' विन्या हसत उत्तरला, ''रूममध्ये गेलो तेव्हा तुमचा तो घाशीराम घोरणे नावाला जागून घोरत होताच. मी जाऊन त्याच्या गालाची एक पप्पी घेतली आणि अगदी नाजूक आवाजात म्हणालो, 'गुडनाइट स्वीटहार्ट, छान गाढ झोप हं!' हा हा हा! रात्रभर बिचाऱ्याचा डोळ्याला डोळा नाही लागला, तर घोरणार कुठून!!!!

जगातली सहा सत्ये-

१. तुमच्या जिभेने तुम्ही तुमच्या सर्व दातांना स्पर्श करू शकत नाही.

२. हे वाचल्यावर प्रत्येकजण तोंडात जीभ फिरवून पाहतोच पाहतो.

३. आपण मूर्ख ठरलो, या जाणीवेने तुम्ही आता स्वत:शीच हसाल.

४. आता तुमच्यात आपल्या मित्रमंडळींना मूर्ख बनवण्याची इच्छा प्रबळ होईल.

५. आता तुम्ही हा एसेमेस आपल्या सर्व जवळच्या मित्रांना फॉरवर्ड कराल.

६. सत्य क्र. १ खोटे आहे!!!!!

अदा

तुम्हारी अदाओं पे
मैं वारी वारी
मैं वारी वारी...
हो सोमवारी
मंगळवारी
बुधवारी
अन् गुरुवारी!!!!

लग्न म्हणजे...

लग्न म्हणजे...
बाहेरून सॉलिड पॉश, छानछोकी दिसणाऱ्या हॉटेलात मित्रांसोबत जाणं...
खूप विचार करून शेवटी आपल्याला हवी ती (आणि परवडेल अशी) डिश ऑर्डर करणं...
आणि नंतर मित्रांनी ऑर्डर केलेल्या डिशकडे पाहून शेवटच्या घासापर्यंत हळहळणं!